तरुणांनो,अकाली टक्कल पडतंय? मग ऐका डॉक्टरांचा सल्ला
 

अनेक तरुण मुलं केस गळणे किंवा टक्कल पडणे याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे कालांतराने डोक्यावरील केस विरळ होत जाऊन पूर्णपणे टक्कल पडते. यात 25% पुरुषांमध्ये गुणसूत्र दोषांमुळे केसगळती सारखी समस्या आढळून येते. तर, वयाच्या २१ व्या वर्षापूर्वीच ही केस गळतीची समस्या दिसून येते. काही किशोरवयीन मुलांमध्ये तर 15 ते 16 वयोगटतही केस गळण्यासारखी समस्या पहायला मिळते. ३० टक्के स्त्रियांमध्ये चाळीशीमध्ये टक्कल पडण्यासारखी समस्या दिसून येते. तर, बदलत्या जीवशैलीमुळे हल्ली विशीतील तरुणींमध्येही टक्कल पडण्यासारखी गंभीर समस्या आढळून आल्याचे वक्तव्य डॉक्टरांनी केले आहे.

हेही वाचा: Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

वाढती स्पर्धा, भिती, चिंता, ताणतणाव आणि चूकीच्या आहार पद्धती या सवयींमुळे केस गळतीची समस्या निर्माण होतांना दिसून येते. तर थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी होणे किंवा विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम, केसांसाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर,केस रंगविण्याकरिता रासायनिक उत्पादनांचा अति जास्त प्रमाणात वापर, जेल यांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास पाहता अनुवंशिकरित्यादेखील केस गळतीची समस्या उद्भवू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता उपचार सुरू करण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना भेट देणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अचूक उपचार करणे योग्य राहिल.

तरुणांमध्ये न्यूनगंड –

गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे व्हर्च्युअल मिटींग्स, व्हिडिओ कॉल सारख्या पर्यायांचा वापर केला जातो. यावेळी आपल्या सहका-यांसोबत बोलताना विशेषतः व्हिडिओ कॉल दरम्यान दिसून येणारे टक्कल अनेक तरुणांमध्ये न्युनगंड निर्माण करत असून या साथीच्या काळात अनेक तरुण ही समस्या घेऊन त्वचारोग तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले. आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपले केस हे सौंदर्यात नेहमीच भर घालणारे ठरतात, मग अशा वेळी टक्कल पडण्यासारखी समस्या तुम्हाला चिंताग्रस्त करू शकते. मात्र अशा वेळी घाबरुन न जाता त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचाराला सुरुवात करा.

काय आहेत त्यामागची कारणे –

१. नियमितपणे केस न धुणे आणि टाळू स्वच्छ न ठेवणे

२. आहारात पोषणमुल्यांचा अभाव

३. गर्भधारणा

४. हार्मोनल असंतुलन

५. एंड्रोजेनेटिक अलोपेशिया म्हणजे आनुवंशिक कारणांमुळे अकाली टक्कल पडणे

६. तणावपूर्ण जीवनशैली

७.थायरॉईड आणि मधुमेह सारखे दीर्घकालीन रोग

८. कर्करोग

Article Source – https://www.esakal.com/health-fitness-wellness/how-do-i-stop-hair-fall-and-help-to-regrow-it